माझे शालेय शिक्षण सुरू असतानाच, माझ्यातील चित्रकलेचे कौशल्य पाहून शिक्षकाने एलिमेंट्री, परीक्षेसाठी माझी निवड केली. त्यात मी "बी" ग्रेडने उत्तीर्ण झालो. शालेय बालभारती पुस्तकावरील पानिपतचे रणसंग्राम हे चित्र, प्रख्यात चित्रकार एम आर आचरेकर यांचे होते, ते मी जसेच्या तसे रेखाटले, हे पाहून जेजे स्कूलचे रणनवरे सर यांनी माझी वाहवा केली व बक्षिस म्हणून तैल रंग दिले.
पुढे शिक्षण घेत, असताना फाउंडेशन या वर्गात माझे काम पाहून वार्षिक बेस्ट स्टुडंटचा अवार्ड मला मिळाला. प्रसिद्ध व मान्यवर दिग्गज चित्रकारांची चित्रे पाहून मन प्रसन्न होत असे. त्या वेळी राहत्या बिल्डिंग मधील लोकांची चित्राची कामे केली.
यात आमच्या प्रभा दिवाळी अंकासाठी सुप्रसिद्ध चित्रकार रघुवीर मुळगावकर यांची चित्रे मुखपृष्ठ व देवाधिकांची चित्रे ही प्रसिद्धीसाठी व छापण्यासाठी येत असत, त्याने मन भारावून जात असे
वडाळा येथील आंबेडकर कॉलेजच्या पोस्टर डिझाईनिंग स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळाले, प्रख्यात चित्रकार एस एम पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल, बाबुराव पेंटर, धुरंदर, इत्यादी मान्यवरांच्या कलेने प्रेरित होऊन कलेचे शिक्षण घेण्यास उत्सुक झालो.
कलेचे शिक्षण व नोकरी हे दोन्हीही एकदमच पूर्ण केली, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई येथे नोकरी करीत असताना महामंडळाचे मुखपृष्ठ असलेले, एसटी समाचार याचे मुखपृष्ठ केले आहे. तसेच एसटी बँकेचाही अहवालाचे मुखपृष्ठ मी केले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाच्या आंतरराज्य विभागीय या नाट्य स्पर्धेत नाटकाचे नेपथ्याचे प्रथम पारितोषिक ही मला मिळाले आहे, मला व्यक्ती चित्रण,अमूर्त कला, निसर्ग चित्र, रेखाचित्र इत्यादी व फोटोग्राफीची कामे करायला आवडतात.